News & Awards
News feed
लोकसत्ता - तरुणाईची अनोखी भटकंती ( December 6, 2019 )
श्वेता बंडबे ही तरुणी अनेक हटके ठिकाणी भटकंती करण्यासाठी टूर्स काढते. परंतु तिच्या फिरण्याच्या आवडीचे रूपांतर व्यवसायात करेपर्यंतचा प्रवास तिच्यासाठी निश्चितच सोपा नव्हता. आपला जॉब सांभाळत फिरण्याची आवड जपण्यासाठी ती एका टूरिस्ट ग्रुपमध्ये सहभागी झाली व तिथे तिने टूर व्यवस्थापनाचे अनेक धडे घेतले. यातूनच तिला आत्मविश्वास मिळाल्यावर तिने २०१८ साली नोकरी सोडून ‘ट्रीपर जर्नीज’ नावाची स्वत:ची कंपनी सुरू केली. सगळ्या टूरिस्ट कंपन्या जिथे नेतात तिथे तिला लोकांना न्यायचं नव्हतं. टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून प्रसिद्ध नसलेली ऑफबीट ठिकाणं ती आधी स्वत: शोधून काढते आणि मग लोकांना दाखवते. प्रसिद्ध ठिकाणांच्या टूर आयोजित करणे चुकीचे नसले तरी आपण लोकांना काही तरी वेगळं द्यायला हवे, असं श्वेता सांगते.
लोकसत्ता - व्हिवा मुसाफिर हूँ यारों.. ( March 29, 2019 )
‘आय.सी.डब्ल्यू.ए. इन कॉस्ट अकाऊंटिंग’ केल्यानंतर तिने नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी केली. आय.सी.डब्ल्यू.ए.ला शेवटच्या वर्षांला एका विषयात तिला गोल्ड मेडलही मिळालं. त्यानंतर पुढची नऊ वर्ष तिने फायनान्सच्या क्षेत्रात नोकरी केली. नोकरी करायला लागल्यावर तिने तिच्या सगळ्या सुट्टय़ा देशभर फिरण्यासाठी उपयोगात आणल्या. आपण पाहिलेला देश इतरांना दाखवावा आणि आयुष्यभर भटकंती करावी अशी इच्छा सगळ्या ‘भटक्यां’प्रमाणे तिचीही होती. याच उद्देशाने २०१६ या वर्षी ऑगस्टमध्ये ‘स्टार बाजार, टाटा’मधली नोकरी तिने सोडली. पण तिचा हा ‘प्रवास’ नोकरीत असल्यापासूनच सुरू झाला होता. स्वत: एकटीच्या जीवावर वर्षभरात २५०हून अधिक जणांना ठिकठिकाणी फिरवून आणणारी ही ‘ट्रॅव्हलर’ आहे श्वेता बंडबे.